यादी जाहीर केल्यानंतर ठाकरेंना यूर्टन घ्यावा लागणार? या उमेदवारांवर संकट!

महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अजूनही सुटत नाहीये, त्यामुळे तिन्ही पक्षांचे नेते मॅरेथॉन बैठका घेत आहेत. एकीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात बैठका सुरू असतानाच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून 65 उमेदवारांची यादी जाहीर केली, पण ही यादी जाहीर होताच नवा ट्वीस्ट आला.यादी जाहीर झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच महाविकास आघाडीचे नेते बैठकीतून बाहेर आले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या यादीमध्ये चुका असल्याचं विधान संजय राऊत यांनी केलं.

‘शिवसेनेच्या मुख्यालयातून आलेल्या यादीत काही करेक्शन आहेत. काहीतरी प्रशासकीय चूक झाली आहे. अशी चूक कशी होऊ शकते? याबाबत अनिल देसाई पाहतील, कारण ते पक्षाचं प्रशासकीय काम पाहतात’, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये 85-85-85 जागांवर तोडगा निघाला आहे, तर 18 जागा या छोट्या पक्षांना दिल्या जाणार आहेत, असं संजय राऊत म्हणाले. म्हणजेच महाविकास आघाडीचा 85-85-85 असा 255 जागांचा तिढा सुटला आहे, तर 18 जागा मित्रपक्षांना दिल्या जाणार आहेत, त्यामुळे 15 जागांचा वाद अजूनही आहे.