वाळवा तालुक्यातील चप्पल शोरूमला आग! बूट, फर्निचर जळून खाक

वाळवा तालुक्यातील ताकारी येथील गणपती मंदिरासमोर असणाऱ्या अरुण महिपती पवार यांचे अरुण फुटवेअर या शोरूमला आग लागून अंदाजे 25 लाखांचे नुकसान झाल्याचा दावा केलेला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरीही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत दुकानातील बूट, चप्पल, फर्निचर जळून खाक झाले आहे.

ताकारी येथील स्फोटामुळे आजूबाजूच्या नागरिकांना जागे करून घराबाहेर काढले. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आग मंगळवारी मध्यरात्री लागल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर आग विझवण्याचा प्रयत्न केला. शेवटी अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत यात फक्त राखत शिल्लक राहिली होती. याबाबत पवार यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद केलेली आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून महावितरणाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी येऊन पंचनामा केला.