पूर्वी घरातील टाकण्यासाठी प्रत्येक कचरा घरासमोर छोटा उकिरडा होता. मात्र तोही कालबाह्य झाला आहे. त्यामुळे घरातील कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध नाही. अनेक वेळा गटारीतच कचरा टाकला जातो. त्यामुळे गटार तुंबली जाऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. वाळवा तालुक्यातील कार्वे येथील कचरा टाकण्यासाठी घंटागाडीची मागणी कित्येक दिवसांपासून होत आहे.
मागणीनुसार ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन घंटागाडी घेण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने कचरा संकलन करण्यासाठी आणलेली घंटागाडी गेली कित्येक महिने धूळखात पडली आहे. तातडीने घंटागाडी सुरू करावी, अशी मागणी सोसायटीचे माजी अध्यक्ष जयकर पाटील व ग्रामस्थांमधून होत आहे.
गावामध्ये दुकाने, हॉटेल व आठवडा बाजार यामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच मात्र नवीन गाडी आणल्यापासूनच ती गाडी एके ठिकाणी धूळखात पडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊन गावामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तरी तातडीने घंटागाडी सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.