खानापूर मतदारसंघात विधानसभेला सुहास भैया बाबर विरोधात……..

खानापूर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. 1995 च्या निवडणुकीचा अपवाद वगळता आतापर्यंत सर्वाधिक वेळा खानापूर व विटा गावांना नेतृत्वाची संधी मिळाली आहे त्यामुळे या निवडणुकीत आटपाडीच्या अस्मितेसाठी या तालुक्यातून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख व ब्रह्मानंद पडळकर यांच्या भूमिकेकडे आटपाडीकरांचे लक्ष लागले आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघातून दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांना महायुतीकडून शिंदे सेनेची उमेदवारी जाहीर झाली आहे. वैभव पाटील किंवा माजी आमदार सदाशिव पाटील यांना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. असे असताना यंदा आटपाडी तालुक्याच्या अस्मितेचा जागर समाज माध्यमातून सुरू आहे. तालुक्यातून उमेदवारी कोण करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.