विद्यार्थ्यांची पहिल्या सत्राची परीक्षा आज (शनिवारी) संपणार असून त्यानंतर शाळा व विद्यार्थ्यांना रविवारपासून दिवाळीच्या सुट्या लागणार आहेत. यंदा शाळांना दिवाळीच्या १५ दिवस सुट्या असणार आहेत. ११ नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा सुरु होतील व दुसऱ्या सत्राचे अध्यापन सुरु होईल.
शाळांना दिवाळी सुट्टी कधी लागेल अन् मामाच्या गावाला कधी जातोय, याची ओढ चिमुकल्यांना लागली आहे. काही शाळांची परीक्षा शुक्रवारी (ता. २५) संपली असून बहुतेक शाळांच्या परीक्षा आज (ता. २६) संपणार आहेत. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांची दिवाळी सुट्टी सुरु होईल. सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून त्यासाठी शिक्षकांसह एकूण १९ हजार शासकीय कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्यूटी आहे. त्यांचे रविवारी तालुकानिहाय पहिले प्रशिक्षण पार पडणार आहे.