मराठा आदोलनाचा मोठा आर्थिक फटका मराठवाड्याला सोमवारी बसला. मराठा आंदोलनामुळे पोलीस अन् प्रशासन आक्रमक झाले. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना जिल्ह्यांत नाकाबंदी करत इंटरनेट सेवा बंद केली. त्याचा सर्वात मोठा फटका उद्योजक, व्यापारी, बँकांसोबत विद्यार्थ्यांनाही बसला होता. तसेच अनेक शासकीय आणि खासगी कार्यालयातील व्यवहार ठप्प झाले. सर्वच ऑनलाईन प्रक्रिया संपूर्णपणे बंद पडल्या होत्या. त्यामुळे त्याचा मोठा आर्थिक फटका व्यापाऱ्यासह इतर सर्वच क्षेत्राला बसला. या जिल्ह्यांमध्ये 5 तास इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांची आर्थिक कोंडी झाली.
इंटरनेट सेवा बंदचा आर्थिक व्यवहारांना जबरदस्त फटका बसला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, बीड आणि जालन्या या तीन जिल्ह्यांत शंभर कोटींचा फटका बसला आहे. इंटरनेट सेवा फक्त पाच तास बंद झाल्यामुळे हा परिणाम झाला आहे. एकट्या संभाजीनगर शहरातील 30 कोटींपेक्षा जास्त व्यवहार ठप्प झाले. इंटरनेट बंदमुळे व्यापारी आणि ग्राहकांची आर्थिक कोंडी झाली. इंटरनेट सेवा पुन्हा पूर्वपदावर आल्यानंतर व्यवहार सुरळीत सुरू झाले.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील सोमवारी मुंबईकडे येण्यास निघाले होते. परंतु भांबेरी येथून अंतरावली सराटीत परत आले. त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. या दरम्यान इंटरनेट सेवा बंद केली गेली होती. कुठलाही चुकीचा मेसेज व्हायरल होऊ नये आणि अफवा पसरू नये, यासाठी इंटरनेट बंद करण्यात आली होती. परंतु त्याचा फटका उद्योजक, व्यापारी, शासकीय आणि खासगी कार्यालयांना बसला.