सांगोला विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल

सांगोला विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल शुक्रवारी म्हणजेच 25 ऑक्टोंबर रोजी दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राजाराम काळेबाग अचकदानी- ज्ञानेश्वर उबाळे वाकी शिवणे अपक्ष असे दोन अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवार अखेर एकूण चार उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. तर 11 उमेदवारांनी 13 अर्जाची खरेदी केली आहे. ९७ अर्जाची विक्री झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भैराप्पा माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे यांनी दिली आहे.