दोन दिवसांपूर्वीच माजी आमदार ॲड. सदाशिव भाऊ पाटील आणि वैभव दादा पाटील यांनी कार्वे गावात बाबर गटाला मोठा धक्का दिला होता. यानंतर दुसऱ्याच दिवशी सुहास भैया बाबर यांनी आपल्या कार्वे या बालेकिल्लात लक्ष घालून पाटील गटाला देखील मोठा सुरुंग लावला आहे. सुप्रिया माळी, अरुण माळी, संपतराव माळी यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी हेमंत अण्णा बाबर, सरपंच बाळासाहेब जाधव, उपसरपंच शिवाजी मदने, सोसायटीचे चेअरमन विजय जाधव, बाजीराव नाना जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुहास भैया बाबर यांनी वैभव दादा पाटील यांच्यावर जोरदार टीका केल्याचे देखील पाहायला मिळाले.
यावेळी सुहास भैया बाबर यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. तसेच ते म्हणाले,
राजकारण करत असताना राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये भर द्यावा हीच आमच्या कुटुंबातील शिकवण असल्यामुळे प्रामाणिकपणे काम करणार आहे.
आज पर्यंत अनिल भाऊंनी जसे प्रामाणिक काम केलेले आहे त्यांच्या पश्चात आता तसेच प्रामाणिक काम आम्ही करू. काम घेऊन आलेल्या प्रत्येक माणसाचे नक्कीच काम पूर्ण केले जाईल.