राज्यातील 21 जिल्ह्यांना 29 ते 31 ऑक्टोबरदरम्यान मुसळधारेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुुळे दिवाळीची सुरुवात पावसानेच होणार आहे. बंगालच्या उपसागरात येऊन गेलेल्या दाना चक्रीवादळामुळे वातावरणात खूप वेगाने बदल होत आहेत. त्यामुळे हवामान विभागाचेही अलर्ट सारखे बदलून नव्याने जाहीर केले जात आहेत.
शनिवारी हवामान विभागाने 27 ते 29 पर्यंत हलक्या पावसाचा अंदाज जाहीर केला होता. मात्र रविवारी ओडिशा किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने क्षीण झालेले पावसाचे अलर्ट पुन्हा तीव्र झाले. त्यामुळे आता राज्यातील 21 जिल्ह्यांना 29 ते 31 ऑक्टोबर या दिवाळीच्या तीन दिवसांत मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत 20 ते 30 मी.मी. पावसाचा अंदाज आहे.
असे आहेत नवे यलो अलर्ट (कंसात तारखा)-
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर (29 ते 31), पुणे (29, 30), कोल्हापूर (29, 30), सातारा (29, 30), सांगली (29), सोलापूर (29), छ. संभाजीनगर (29, 30), जालना (29, 30), परभणी (29), बीड (30), हिंगोली (29), धाराशिव (30), भंडारा (29), चंद्रपूर (29 ते 30), गडचिरोली (27), नागपूर (30), वर्धा (30, 31), यवतमाळ (29 ते 31).