मोकाट कुत्र्यांचा त्रास! बंदोबस्त करण्याची नागरिकांमधून मागणी

कुंभोज येथे मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या त्रासामुळे नागरिक हैरान झाले आहेत. लहान मुलांना एकटे घराबाहेर पाठविणे धोक्याचे वाटत आहे. त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या जोर देत आहे. ग्रामपंचायत हद्दीत मोकाट कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. विशेष करून ते लहान मुलांवर धावून जात आहेत. तसेच पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिकांवरही धावून जातात मागे लागतात. रात्री भुंकत असल्याने काहींना निद्रानाश होत आहे. त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या नागरिकांमधून होत आहे.