सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात लढतीचे चित्र स्पष्ट झालं आहे. खानापुरात धनुष्यबाण आणि तुतारीमध्ये लढत होणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे सुहास बाबर विरुद्ध शरद पवार गटाकडून वैभव पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे.वैभव पाटील यांना शरद पवार गटाकडून काल (27 ऑक्टोबर) रात्री उमेदवारी जाहीर झाली.
आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख तुतारीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण आता शरद पवार गटाची उमेदवारी वैभव पाटील यांना भेटल्याने राजेंद्र देशमुख गट काय भूमिका घेणार? याकडे लक्ष आहे. दरम्यान वैभव पाटील आज खानापूर मतदारसंघातून अर्ज भरला आहे.