आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघांमध्ये निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र आपणास पहावयास मिळतच आहे. अशातच सांगोला शहर व तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, गुन्हेगारी प्रवृत्तींना चाप बसावा तसेच सांगोला विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मतदान करून निर्भयपणे लोकशाहीचा उत्सव साजरा करावा यासाठी सांगोला पोलीस सज्ज झाले आहेत. सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीच्या अनुषंगाने सांगोला शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंंचालन करण्यात आले. मतदारांनी विधानसभा निवडणुकीमध्ये निर्भय वातावरणाने मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा असे आव्हान देखील केलेले आहे.
Related Posts
काय झाडी, काय डोंगर फेम शहाजी बापू पाटील यांचं भाकीत काय?
निवडणूक ही तुमच्या पाच वर्षाच्या कामावर आणि कष्टावर चाललेली असते. कोणत्याही निवडणुकीत शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे असतात. त्यामुळे सर्व्हे चुकीचे…
पाच वर्षात केलेल्या कामांच्या बळावर मैदानात : आमदार राजूबाबा आवळे
गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील गावागावांमध्ये २५५ कोटींची कामे केली आहेत. हजारो कोटींच्या गप्पा न मारता जेवढी कामे केली, तेवढीच सांगत…
जयंत पाटील शिंदे सरकारमध्ये येणार होते ! असा शिंदे गटातील नेत्याचा दावा…
शिंदे सरकार अस्तित्वात आलं तेव्हापासून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मध्यंतरी अजित पवार गट महायुतीत सहभागी झाला. तेव्हा राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची…