राजकारणात घराणेशाही चालणार नाही म्हणणारे नेते निवडणूक येते, तेव्हा मात्र सग्यासोयऱ्यांची सोय कशी होईल, यासाठी खटाटोप करीत असतात. सध्याची विधानसभा निवडणूकही पै-पाहुणे आणि गोतावळ्याभोवतीच फिरताना दिसून येते. इस्लामपुरातून निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व शिराळ्यातून भाजपतर्फे रिंगण्यास इच्छुक असलेले सत्यजीत देशमुख हे दोघेही सख्खे साडू आहेत. दोघेही म्हैसाळच्या शिंदे घराण्याचे जावई आहेत. जयंत पाटील यांच्या पत्नी शैलजा व सत्यजीत यांच्या पत्नी रेणुका सख्ख्या बहिणी आहेत. शिवाय जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे हेदेखील राहुरीचे आमदार आहेत.
Related Posts
इस्लामपुरात गटारीच्या कामाने रस्ता बंद! गटारीचे काम लवकरच पूर्ण करण्याची नागरिकांमधून मागणी
पालिका प्रशासन आणि ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे इस्लामपूर शहरातील शाहूनगर मधील होत असलेल्या गटारीचे काम गेल्या दोन महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे…
इस्लामपुरात राहत्या घरी आत्महत्या
इस्लामपूर शहरामध्ये एका ५५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घराच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. हा प्रकार…
इस्लामपूर बसस्थानकात खड्डेच खड्डे चालकांची तारेवरची कसरत….
इस्लामपूर शहराचा भौगोलिक विचार करता इस्लामपूर बसस्थानकावर विविध शहरातील एसटी बसेसची प्रमाणात सुरू असते. मात्र बसस्थानक आवार असुरक्षित बनला आहे.…