इस्लामपूरात तहसीलदार’कडून रेशन दुकानदारांची पिळवणूक

इस्लामपूर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून वितरित होणाऱ्या धान्यामध्ये गोलमाल असल्याचा आरोप सांगली जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कोरे यांनी केला आहे. त्यांनी याबाबत तहसीलदार प्रदीप उबाळे यांना निवेदन देऊन तक्रार केली आहे.

शासनाच्या नियमाप्रमाणे धान्य पुरवणाऱ्या ठेकेदाराने शहरी विभागासाठी थेट स्वस्त दुकानदारांना धान्य पुरवावे, असा आदेश आहे. मात्र शासकीय गोदामात धान्य वितरित करताना यामध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप कोरे यांनी केला आहे.
सन २०१७ पासून धान्य दुकानदारांच्या केरोसीन व धान्य वितरण परवान्यांचे अजूनही नूतनीकरण केले नाही. वारंवार हेलपाटे घालूनही याची दखल घेतली जात नाही.

पुरवठा विभागात चिरीमिरी केल्याशिवाय कागद पुढे सरकत नाही. याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी कोरे यांनी केली आहे.संगणक विभागातील काम करणारे झिरो कर्मचारी दुकानदारांना उडवाउडवीची उत्तरे देऊन बेजार करतात. या झिरो कर्मचाऱ्यांवर एका वरिष्ठ कर्मचाऱ्याचा वरदहस्त पॉस मशिन्स बंद पडतात. स्लो चालतात. यामुळे समस्या निर्माण होत आहेत. अशी स्वस्त धान्य दुकानदारांची तक्रार आहे.