निवडणूक म्हटले की, प्रत्येक घडामोडीवर निवडणूक विभागाची करडी नजर असतेच. निवडणुकीच्या काळात प्रत्येक उमेदवाराने किती खर्च करायचा, याबाबतचे नियम व अटी निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. एका उमेदवाराला विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरायला किती खर्च येतो? अर्ज भरताना नेमक्या कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतात? अर्ज भरायला किती वेळ अन् किती खर्च येतो? या सर्व गोष्टींवर निवडणूक विभाग नजर ठेवून असल्याचे पाहायला मिळत आहे.
उमेदवारांच्या प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे.उमेदवारी अर्जांची छाननी होऊन शिल्लक अर्जांपैकी कोण ठेवणार आणि कोण मैदानात उतरणार हे ४ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंतच्या सर्व हालचालींवर निवडणूक आयोगाच्या टीमचे लक्ष राहणार आहे. उमेदवारांच्या सभा, रॅली, जेवणावळ्या या सर्व गोष्टींचे चित्रिकरण होत आहे. यामुळे उमेदवारांना खर्च जपूनच करावा लागणार आहे.
तसेच सर्व हिशोबही व्यवस्थित निवडणूक आयोगाकडे दिला पाहिजे. उमेदवारांनी हिशोब चुकविण्याचा प्रयत्न केल्यास सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांची बोगसगिरी उघडकीस येणार आहे.