आम. आवाडे व आम. कोरे यांच्यात राजकीय गुप्त चर्चा!

आमदार आवाडे हे गमिनी काव्याने राजकारण करणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत.तर आमदार डॉ. विनय कोरे हे बिनधास्त राजकारण करणारे ताकदवान नेते आहेत. या दोन्ही नेत्यांच्या शाहूवाडी- पन्हाळा, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ या विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणिते दक्षिणमध्ये नेमके काय करता येऊ शकते यावर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान या दोन्ही नेत्यांचा मानणारा एक वर्ग कागल विधानसभा मतदारसंघातही आहे. येथीलही आढावा घेतला गेल्याचे सांगण्यात येत आहे. शिरोळ तालुक्यातील घडामोडीबरोबर हातकणंगलेतील घडामोडीवर ही चर्चा झाल्याचे वृत्त आहे.या खलबत्तखाण्यात नेमकी राजकीय चर्चा काय झाली आणि त्याचे पडसाद काय उमटणार आहेत हे येणाऱ्या काळात नक्कीच दिसून येईल.