आटपाडी शहरातील साई मंदिर चौक येथे कराड-आटपाडी बस व मालवाहतूक ट्रक यांच्यात झालेल्या अपघातामध्ये एसटी चालक, वाहक यांच्यासह ६ प्रवाशी जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत एसटी चालक महादेव पवार याने ट्रकचालक सदाशिव मल्लाप्पा इसापुरे यांच्या विरोधात आटपाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, आटपाडी आगाराची बस क्रमांक एम एच १४ बीटी ४२१७ ही कराडहून आटपाडीकडे चालक महादेव पवार व वाहक वैभव यादव हे घेऊन येत होते. एसटी आटपाडी येथील साई मंदिर चौक येथे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ट्रक चालक सदाशिव इसापुरे ट्रक नंबर एम एच १० सी आर ९०९९ हा गतीने चालवून एसटी स धडक देऊन चालक, वाहक व सहा प्रवाशी यांना जखमी केले.
आटपाडीत बस-ट्रकचा अपघात; सहाजण जखमी
