जांभळे गटाची विधानसभा निवडणुकीतून माघार; मदन कारंडे यांना पाठिंबा

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. 20 नोव्हेंबरला मतदान असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. जांभळे गटाने विधानसभा निवडणुकीतून माघार घेऊन मदन कारंडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून मदन कारंडे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. महाविकास आघाडीचे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मतदान कारंडे यांना पाठिंबा देत आपण निवडणूक लढणार नाही अशी भूमिका जांभळे गटांनी घेतली आहे