इचलकंजीतील सुळकुड पाणी योजनेचे काम त्वरित सुरू करा : आमदार प्रकाश आवाडे

इचलकरंजीसाठी काळम्मावाडी धरणात ठेवलेल्या शिल्लक कोट्यातील पाणी सुळकूड योजनेतून मिळणार असल्याने कोणाचे नुकसान होणार नाही. त्यामुळे राज्य शासनाने त्याला तातडीने मान्यता देऊन योजनेचे काम सुरु करावे, त्याचबरोबर यंत्रमाग उद्योगासाठी जाहीर केलेल्या सवलती आणि यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी नागूपर येथे सुरू असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मांडली.

जे जाहीर केले आहे ते तातडीने द्यावे म्हणजे अडचणीतील उद्योग-व्यवसाय पुन्हा गतीने प्रगती साधू शकेल, असेही त्यांनी सांगितले. आमदार आवाडे यांनी ३ वर्षे झाले तरी राज्य शासनाने इचलकरंजीला पिण्याच्या पाण्यासाठी मंजूर केलेल्या सुळकूड योजनेचे काम सुरू झाले नाही.प्रत्यक्षात ज्यावेळी काळम्मावाडी धरण बांधले त्यावेळी इचलकरंजीसाठी पिण्याच्या पाण्याचा कोटा शिल्लक ठेवला आहे.

सध्या सुळकुड योजनेवरुन स्पर्धा सुरु झाली असून काहीजण पाणी द्या म्हणतात तर काहींचा विरोध आहे.राज्य शासनाकडून गेल्या काही वर्षात यंत्रमाग व्यवसायासाठी केवळ योजना जाहीर केल्या जात असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. २०१६ मध्ये तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी २७ अश्वरशक्तीखालील यंत्रमागासाठी १ रुपयांची अतिरिक्त सवलत आणि कर्जावरील व्याजात केली होती.

त्याचा सातत्याने ५ टक्क्याची सवलत जाहीर केली होती.त्याचा सातत्याने पाठपुरावा करूनही ८ वर्षे झाली तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. ३ वर्षापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात २७ अश्वमशक्तीवरील यंत्रमागासाठी ७५ पैशांची अतिरिक्त बीज सवलत जाहीर करुन त्यासाठी तरतूदही केली होती.

पण अद्याप त्याचीही अंमलबजावणी झाली नाही. योजना जाहीर होतात पण त्याची अंमलबजावणी होत नसेल तर उद्योगाच्या प्रगतीच्या गतीची अपेक्षा का करावी ? असा सवाल करत आमदार आवाडे यांनी जे जाहीर केले आहे त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली.