महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत राज्यातील 2 कोटी 3 लाखांहून अधिक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात किमान 4 ते 5 हप्ते जमा झाले आहेत. लाडकी बहिण योजनेंतर्गत दिवाळी बोनसही देण्यात आला.मुख्यमंत्री म्हणाले की, लाडकी बहिण योजनेंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाला असून डिसेंबरची रक्कमही विधानसभा निवडणुकीनंतर लगेच दिली जाईल. ज्या महिलांचे कुटुंब वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना दरमहा लाडकी बहीन योजनेअंतर्गत 1,500 रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाते.
महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांवर एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील निवडणूक प्रक्रिया 25 नोव्हेंबरला पूर्ण होणार आहे. त्यामुळे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर योजनेचा सहावा हप्ता 25 नोव्हेंबरनंतर दिला जाण्याची शक्यता आहे.