गेल्या ३० वर्षापासून घेरडी गटात शेतकरी कामगार पक्षाचे एकहाती वर्चस्व प्रस्थापित करण्याचे काम करणारे शेकापचे दिग्गज नेते भाऊसाहेब यमगर सर यांनी शेकापमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून दिपकआबा साळुंखे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशालीची सर्वाधिक धग शेकापला बसली असून हजारो कार्यकर्त्यांनी दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने शेकापचा गड नेस्तनाबूत झाला आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या दिग्गज नेत्याने आपल्या असंख्य समर्थक कार्यकर्त्यांसह दिपकआबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याने सांगोला तालुक्याच्या राजकीय इतिहासातील हा सर्वात मोठा पक्षप्रवेश मानला जात आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी गेली वीस ते पंचवीस वर्षे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला महाविकास आघाडीने दिपकआबांच्या कामाचा अनुभव आणि तालुक्यातील राजकीय ताकद यांचा विचार करून त्यांना उमेदवारी दिली आहे.
डॉ. बाबासाहेब देशमुख आणि डॉ. अनिकेत देशमुख या दोन्ही डॉक्टरबंधूंनी दिपकआबा साळुंखे पाटील यांनी स्वर्गीय आबासाहेबांना केलेल्या मदतीची जाणीव ठेवून महाविकास आघाडीचा धर्म पळावा आणि अजूनही दिपकआबांना आपला पाठिंबा जाहीर करावा अशी भावना शेतकरी कामगार पक्षातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.