फॅबटेक कॉलेज येथे माजी सरपंच संजय नाना रुपनर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील यांचा सत्कार करून संपूर्ण रुपनर कुटुंबीय आणि फॅबटेक परिवार दिपकआबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे अभिवचन दिले यावेळी रुपनर कुटुंबीय आणि फॅबटेक परिवारातील सदस्य उपस्थित होते.
मेडशिंगी येथील रुपनर कुटुंबीयांनी नेहमीच समाजकारणाला प्राधान्य दिले. समाजातील तरुणांच्या हाताला काम मिळावे आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी रुपनर कुटुंबाने केलेले कार्य अद्वितीय आहे. २०१९ रोजी झालेल्या विधानसभा निवडणूक शहाजीबापू पाटील यांना आमदार करण्यात रुपनर कुटुंबीय आणि साळुंखे पाटील कुटुंबीयांनी सर्वात महत्त्वाचे योगदान दिले होते. आज रुपनर कुटुंबीय आणि संपूर्ण फॅबटेक परिवार माझ्यासोबत आल्याने मला लढायला आणखी बळ मिळाले. रुपनर कुटुंबीय आणि फॅबटेक परिवाराचा मी सदैव ऋणी राहीन. असे मत मा.आ. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केले.