तीन राज्यातील पराभव विसरून सर्वांनी नव्या जोमाने कामाला लागावे. राज्यात महाविकास आघाडी व देशात इंडिया आघाडी एकत्रित लढल्यास निश्चितपणे भाजपचा पराभूत होईल, असा विश्वास आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.
नागपूर येथे २८ डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस साजरा केला जाणार असून त्याच्या नियोजनासाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत सोलापूर शहर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकत्यांची शनिवारी (ता. २३) बैठक पार पडली. त्यानंतर आमदार शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.आमदार शिंदे म्हणाल्या, महागाई, बेरोजगारी, लोकसभेत १४६ खासदारांचे निलंबन, अल्पसंख्यांकावरील अन्याय, धार्मिक तेढ आणि लोकशाहीची हत्या, अशा विषयांवर सर्वांनी आता रस्त्यांवरील लढाईसाठी सज्ज रहावे.
नागपूर येथे दहा लाख काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली आणि जाहीर सभा होणार आहे. पुढील वर्षी लोकसभेसह अनेक निवडणुका आहेत. कार्यकत्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग या रॅलीतून फुंकले जाईल. त्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते जाणार असून त्यांच्या नियोजनासाठी ही बैठक बोलावली होती, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, महिला शहराध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, रियाज हुंडेकरी, प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, तौफिक हत्तुरे, फिरदौस पटेल, वैष्णवी करगुळे, परवीन इनामदार, गणेश डोंगरे, अंबादास करगुळे, देवा गायकवाड, उदयशंकर चाकोते, भारती ईप्पलपल्ली, अश्विनी जाधव, संजीवनी कुलकर्णी, भीमाशंकर टेकाळे, जुबेर कुरेशी, किसन मेकॉले, ड. मनीष गडदे, सुमन जाधव, संघमित्रा चौधरी, शिल्पा चांदने, मुमताज तांबोळी, सबीना इंगळगी, रेखा बिनेकर, सुबोध सुतकर, भाग्यश्री कदम, मीरा घटकांबळे, निशा मरोड, शुभांगी लिंगराज, वर्षा अतनुरे, अंजना सावंत, रुपाली खिलारे, मुमताज शेख, सलीमा शेख, मुमताज शेख, विजयालक्ष्मी झाकने, चंदा काळे, लता सोनकांबळे, सुनीता बेरा, बसंती साळुंखे उपस्थित होते.