विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातील शेकडो कार्यकर्ते दिपकआबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. शेतकरी कामगार पक्षातील मनमानी कारभाराला कंटाळून यलमार मंगेवाडी गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा लाल सलाम करीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी गावात शेकापला धक्का बसला असून असंख्य कार्यकर्त्यांनी दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करीत मशाल हाती घेतली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे सध्याचे नेतृत्व विश्वासात घेत नसल्याने तसेच अंतर्गत गटबाजीला कंटाळून कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी गावात शेकापला धक्का बसला असून असंख्य कार्यकर्त्यांनी दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करीत मशाल हाती घेतली आहे.
यलमार मंगेवाडी येथील प्रकाश मुरलीधर भडंगे, नितीन सोपान भडंगे, अक्षय प्रकाश भडंगे, विकास भाऊ भडंगे, भानुदास भाऊ भडंगे, वसंत संदिपान भडंगे, तानाजी संपत भडंगे, हनुमंत अरविंद भडांगे, दत्तात्रय हातेकर खंडू भडंगे, मुरलीधर सदाशिव भडंगे, बंटी शामराव भडंगे, शशिकांत भडंगे विजय भडंगे या कार्यकर्त्यांनी शेकापला रामराम करीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांना यलमार मंगेवाडी गावातून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.