ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन सुरू झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आजपासून अंतिम टप्प्यात पदार्पण करत आहे.आज पाटण येथील जाहीर सभेतून यात्रेचा अंतिम टप्पा सुरू होईल तर १६ ऑक्टोबर रोजी इस्लामपूर येथे जाहीर सभेच्या माध्यमातून यात्रेची सांगता होईल.
शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा इस्लामपूर येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या वातावरणात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर वाळवा मतदारसंघात ही सभा पार पडत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रचाराचा नारळ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघातून फुटणार व हीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विजयी सभा ठरणार अशी इस्लामपूरातील जनतेची भावना आहे.