फक्त दिपकआबाच उपेक्षित आणि वंचितांना न्याय देऊ शकतात ; नगरसेविका अप्सराताई ठोकळे

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सांगोला शहरात शहाजी बापू पाटील यांना मोठा धक्का बसला असून नगरसेविका अप्सराताई ठोकळे यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांनी शहाजीबापूंची साथ सोडून दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. गेली ३० ते ३५ वर्षे माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी निस्वार्थी भावनेने सांगोला तालुक्यातील जनतेची सेवा केली आहे. त्यांच्याकडे जाणाऱ्या गरजू लोकांचा त्यांनी कधीच पक्ष किंवा जात पहिली नाही सांगोला विधानसभा मतदारसंघात उपेक्षित आणि वंचितांना फक्त दिपक आबा साळुंखे पाटील हेच न्याय देऊ शकतात असा विश्वास सांगोला नगरपालिकेच्या माजी सभापती आणि नगरसेविका अप्सराताई ठोकळे यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना नगरसेविका अप्सराताई ठोकळे म्हणाल्या सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करत असताना अनेक वेळा माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडे आम्ही गेलो प्रत्येक वेळी त्यांनी आमच्या कामाला प्राधान्य देऊन आमचा पक्ष किंवा अन्य बाबी न पाहता सांगितलेले काम प्रामाणिकपणे पार पाडले. कोणत्याही कामात त्यांनी कधीच स्वार्थ पाहिला नाही.

अशा निस्वार्थी आणि निगर्वी नेत्याच्या पाठीशी सांगोला तालुक्यातील संपूर्ण उपेक्षित आणि वंचित समाज उभा राहील आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार असलेल्या दिपकआबांना तालुक्यातील उपेक्षित आणि वंचित भगिनी बांधव प्रचंड बहुमतांनी विजयी करतील असा आशावाद शेवटी अप्सराताई ठोकळे यांनी व्यक्त केलायावेळी चंचल बनसोडे, विनोद रणदिवे, रामस्वरूप बनसोडे, सिताराम बनसोडे, सोमा ठोकळे, आण्णा बनसोडे, रणजीत बनसोडे, महेश प्रक्षाळे, श्रीकांत बनसोडे, सचिन प्रक्षाळे, आतीन काटे, गौतम शिंदे, स्वप्निल शिंदे,

पूर्वज सरगर, विश्वजीत बनसोडे, श्रीधर बनसोडे, विद्याधर बनसोडे, टिल्लू बनसोडे, आतिश काटे, दीपक रणदिवे, अक्षय रणदिवे, सुरेश रणदिवे, कुंडलिक रणदिवे, जयदीप रणदिवे, ऋतिक सरगर, सम्यक बनसोडे, श्रीनाथ ठोकळे, सागर शिंदे, आदित्य काटे यांच्यासह कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या. यावेळी माजी नगरसेवक सतीश सावंत, शिवसेना शहरप्रमुख तुषार इंगळे उपस्थित होते.

अठरापगड जाती-जमाती, सर्व धर्माच्या विकासाचे आमचे लक्ष्य असून महाविकास आघाडी उपेक्षित समाजाच्या भक्कमपणे पाठीशी उभी आहे. आयुष्यभर माणुसकीचा धर्म हाच श्रेष्ठधर्म मानून समाजसेवा सुरू आहे. समाजाप्रती असलेले ऋणानुबंध, जनसेवेसाठी मिळालेली संधी या जबाबदारीने कधीच स्वस्थ बसलो नाही.

समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी तसेच उपेक्षित समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देत राहणार असून हेच खरे आत्मसमाधान असल्याचे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले