खानापूर विधानसभा मतदारसंघात दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या मुद्द्यावर गेल्या सात निवडणुकांपासून श्रेयवाद चांगलाच रंगलेला पाहायला मिळत आहे. 1995 च्या विधानसभा निवडणुकीवेळी सुरू झालेल्या टेंभूचा प्रश्न आता 2024 च्या निवडणुकीत ही पुन्हा ऐरणीवर येत आहे.
गेल्या सात निवडणुकांपासून सुरू असलेल्या माजी आमदार अनिल बाबर व सदाशिवराव पाटील यांच्यातील टेंभूच्या श्रेयवाद दुसऱ्या पिढीतही रंगणार आहे. त्यामुळे निवडणुकीतही टेंभूच्या श्रेयवादाचा धुरळा पुन्हा एकदा उडण्याचे संकेत आहेत. खानापूर मतदारसंघात टेंभू योजनेचा मुद्दा प्रत्येक विधानसभा निवडणुकीत कळीचा बनत आहे. 1995 च्या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा बनलेली टेंभू योजना 2024 च्या सातव्या विधानसभेत ही कायम आहे आता ही योजना अंतिम टप्प्यात आली असून टेंभूच्या सहाव्या टप्प्याचे काम सुरू होत आहे