आटपाडी येथे गोल्डन सिटीची गुढीपाडव्या दिवशी केला मुहूर्तमेढ

आटपाडी शहरालगतच आरएमडी ग्रुपच्या विद्यमानाने गोल्डन सिटीचा प्रारंभ रविवारी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जि. प. माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या हस्ते झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. आटपाडी शहराचा विस्तार हा प्रगती पथावर सुरू असतानाच आता विविध क्षेत्रात सिटी निर्मिती होत आहे. आरएमडी ग्रुपमार्फत गोल्डन सिटी नव्याने सुरू होत आहे. यामध्ये १९ एकरमध्ये भव्य प्लॉटिंग प्रोजेक्ट साकारणार आहेत.

यामध्ये दीड गुंठ्यापासून ११ गुंठ्याचे प्लॉट असणार आहेत. प्रत्येक प्लॉटला नळ कनेक्शन, स्ट्रिट लाईट, रस्ते, भव्य आकर्षक कमान, संपूर्ण सिटीला कंपाऊंड, अशा सुविधा असणार आहेत, यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, युवा नेते दिग्विजय देशमुख, युवा नेते ऋषिकेश देशमुख, डॉ. विनय पत्की, वीज वितरण कंपनीचे संजय बालटे, राहुल देशमुख, शिवजल ग्रुपचे राहुल देशमुख उपस्थित होते.