दिवाळीत लालपरी ठरली सोनपरी! मिळालं ५० लाख ३१ हजाराचे उत्पन्न

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आगाराकडून प्रवासी नागरिकांच्या सोयीसाठी ज्यादा बसेसची सोय करण्यात आली होती. यंदाच्या दिवाळीला महामंडळाची एसटी बसआता लालपरी ही सोनपरी ठरली
आहे. इचलकरंजी आगाराकडून जवळच्या व लांबच्या पल्यासह महाराष्ट्रभर व राज्याबाहेरही सेवा पुरवण्यात आली. यातून इचरकंजी आगाराला तब्बल ५० लाख ३१ हजार ५३० रुपयाचे उत्पन्न मिळाले. यामुळे या दिवाळी सणाच्या काळात एसटीचा प्रवास सुखकर प्रवास म्हणत सामान्य नागरिकांनी महामंडळाच्या एसटी बसला अधिक प्राधान्य दिल्याचे दिसून आले.
गोरगरीब कष्टकऱ्यांची दिवाळी उत्सव आनंदात साजरी होण्याकरिता महामंडळाच्या एसटी बस ही नागरिकांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असते.

यावेळी या बसने एक लाख २८ हजार ६८९ प्रवाशांनी लाभ घेतला असून, एक लाख १३ हजार ४४ किलोम ीटरचा प्रवास केला आहे. यातून महामंडळाला भरघोस असे ५० लाख ३१ हजार ५३० रुपयाचे उत्पन्न मिळाले तर यंदाच्या प्रवासामध्ये ६७ हजार ३६६ महिलांनी विशेष करून प्रवास केला. तर दरवर्षीच्या वाढवण्यात येणाऱ्या दहा टक्के भाडेकर वाढ झाली नसल्याने यावेळी प्रवाशांना अधिक रुपये मोजावे लागले नाहीत.

गतवर्षी २०२३ मध्ये सोडण्यात आलेल्या बसेसच्या माध्यमातून एक लाख १६ हजार ४००१ किलोमीटरचा प्रवास नागरिकांनी
केला होता. यामधून ५५ लाख ७५ हजार ४४५ रुपये इतके उत्पन्न मिळाले होते. तर यावर्षी २०२३ च्या तुलनेने तब्बल ५ लाख ४३ हजार ९१५ रुपये इतकी उत्पन्नात घट झाली आहे.