इचलकरंजी महानगरपालिकेची जीएसटीची ११०० कोटी रुपये राज्य सरकारकडे थकीत आहे. तसेच सहाय्यक अनुदान हे सुमारे पावणे तीनशे कोटी रुपये थकीत आहे. त्या बैठकीसाठी राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या इचलकरंजी दौऱ्यावर येत आहेत. म्हणून महानगरपालिका प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. इचलकरंजीच्या विविध विकास कामांच्यासाठी निधीची मागणी केली जाणार आहे. थकीत जीएसटीची रक्कम देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेला दिलासा देणार का? याकडे इचलकरंजीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
महानगरपालिकेला आपली हक्काची रक्कम मिळाल्यास विविध प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यास मदत होणार आहे. प्रत्येक महिन्यात सुमारे दहा ते पंचवीस कर्मचारी सेवानिवृत्ती होत आहेत. त्या बैठकीसाठी महानगरपालिकेच्या त्यामुळे भविष्यकाळात ही रक्कम वाढत जाणार आहे. महानगरपालिकेने काही रकमाही कर्जाने घेतली आहे. अशा परिस्थितीत अर्थमंत्र्यांनी महानगरपालिकेला रक्कम दिल्यास मोठा आधार ठरणार आहे. अर्थमंत्र्यांच्याकडे काही विकास कामांचे सादरीकरणही करण्यात येणार असल्याचे समजते. त्यासाठी महापालिकेची लगबग सुरू आहे. तसेच नाम. अजित पवार हे महानगरपालिकेत आढावा बैठक घेणार आहेत. त्या बैठकीसाठी महानगरपालिकेच्या इमारतींची, आवाराची आणि एका दालनाची रंगरंगोटी केली जात आहे.