राहुल आवाडे आमदार होणार हे निश्चित आहे. पण आपण जिंकणार म्हणून कोणीही गाफिल राहू नका. यंदाची लढाई ही आर या पार अशी असल्याने सर्वांनी तळागाळापर्यंत पोहचून अधिकाधिक मतदान कसे होईल याकडे कटाक्षाने लक्ष द्या.
मी राजकारणातून निवृत्त झालेलो नाही. पण राज्यातील गतीमान विकासाची गंगा अविरत राहण्यासाठी राज्यात महायुतीचे सरकार असले पाहिजे आणि त्यासाठीच राहुल आवाडे यांना निवडून द्यायचे आहे, असे आवाहन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले.
इचलकरंजी शहर व परिसरातील विविध सहकारी संस्थांमधील चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक यांच्या प्रमुख बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार आवाडे बोलत होते.
राज्यात मागील अडीच वर्षातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याचा गतीमान विकास केला. या सरकारच्या माध्यमातून प्रदीर्घकाळापासून प्रलंबित असलेले वस्त्रोद्योगाचे प्रश्न सोडविले आहेत. त्यामुळे महायुतीचेच सरकार आणायचे आहे.
