मनोज जरांगे पुन्हा परतले, विधानसभा निवडणुकीबद्दल 10 तारखेला करणार मोठी घोषणा

विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी काही मतदारसंघामध्ये लढणार आणि पाडणार अशी भूमिका घेतली होती. पण लगेच दुसऱ्या दिवशी माघार घेतली होती. मराठा उमेदवार निवडून आला नाहीतर लढ्याचं हसू होईल, अशी भूमिका जरांगेंनी जाहीर केली होती.पण आता 10 नोव्हेंबरला आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करणार असं जरांगेंनी सांगितलं आहे.

विधानसभा निवडणुकीत मराठा समाज योग्य भूमिका घेईल, असं सांगत येणाऱ्या दहा तारखेला मी माझी भूमिका स्पष्ट करणार, असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. शिवाय शेवटच्या दोन दिवसातही मराठा समाज कार्यक्रम लावू शकतो, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.