दिपकआबांच्या एका हाकेवर जमला ५० हजारांचा जनसमुदाय

२०१९ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीतच मी शिवसेना पक्षाकडून दिपकआबा साळुंखे पाटील यांना उमेदवारी देणार होतो परंतु काही कारणास्तव मी त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही. २०१९ ला शिवसेनेचा आमदार निवडून आणणार असा त्यांनी मला शब्द दिला होता. सर्वसामान्य जनतेसाठी लढणारे दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासारखे सैनिक मला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आवडतात. सांगोला विधानसभा मतदारसंघातील जनतेने फक्त दिपकआबा साळुंखे पाटील यांना आमदार करावे सांगोला तालुक्यातील जनतेच्या मनात असणाऱ्या एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही असे अभिवचन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी तमाम सांगोलकरांना दिले.

२५३ सांगोला विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला येथे आयोजित केलेल्या अतिविराट सभेला संबोधित करताना उद्धवसाहेब ठाकरे बोलत होते. सांगोला तालुक्याच्या राजकीय इतिहासातील ही ऐतिहासिक आणि रेकॉर्डब्रेक सभा ठरली. या अतिविराट आणि भव्यदिव्य सभेसाठी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या एका हाकेवर तब्बल ५० हजार सांगोलकरांनी या सभेला उपस्थिती दर्शविल्याने सबंध राज्यभर या सभेची चर्चा रंगली. सांगोला विधानसभा मतदारसंघातील धनगर समाज बांधवांनी काठी घोंगडं आणि ढोल देऊन उद्धवसाहेब ठाकरे यांचा सत्कार केला.