राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा आणि गाठीभेटींचा धडाकाच सुरू केला आहे.त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगही जोमाने कामाला लागले असून भरारी पथके, स्थिर पथके, पोलीस यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जनजागृती करत आहे. पाच वर्षांत प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली आहे. विकासकामांसाठी मोठा निधी अतिग्रेसाठी दिला आहे. ग्रामस्थांचे भक्कम पाठबळ मिळत असल्याने विजय निश्चित असल्याचा विश्वास आमदार राजू आवळे यांनी व्यक्त केला.अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील प्रचार फेरीवेळी ते बोलत होते.
जय जवान जय किसान किसान संघटनेचे अध्यक्ष, माजी सैनिक तानाजी पाटील म्हणाले, जनतेच्या अडीअडचणीत तत्काळ धावून येणारे, सहज भेटणारे हक्काचे आमदार म्हणून राजू आवळे यांनी ओळख निर्माण केली आहे. माजी सरपंच पांडुरंग पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचे सर्व पक्षातील कार्यकर्ते राजू आवळे यांच्या विजयासाठी ‘घर टू घर’ प्रचार करत आहेत. गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक जोमाने कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
यावेळी उपसरपंच बाबासो पाटील, अमर पाटील, सदस्य भरत शिंदे, पोपट पाटील, भिकाजी पाटील, संदीप सूर्यवंशी, महादेव चौगुले, चिंतामणी कांबळे, सारंग पाटील, वसंत पाटील, नितीन पाटील, संग्राम जाधव, सतीश बिडकर, जालिंदर बिडकर आदी उपस्थित होते.
चोकाक येथे भव्य पदयात्रा निघाली. राजू आवळे यांना चोकाक गावातून विक्रमी मते दिली जातील, असे माजी उपसरपंच नंदकुमार पाटील यांनी सांगितले. यावेळी बाळासो देशिंगे, पद्मजा देशिंगे, संजय शिंदे, हर्षद कांबळे, प्रणाली कांबळे, कुसुमताई माने, अरविंद कुंभार, सुभाष माने, माजी सरपंच काशिनाथ चोकाककर, महादेव मोरे, विद्या चव्हाण, जानकी मोरे, दिनकर शिंदे, संतोष लोहार, सागर माळी, बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते. मुडशिंगी, माले, मालेवाडी येथील पदयात्रेसही प्रतिसाद मिळाला.