अनिलभाऊं विरोधात ठाकरे गटाची टाईट यंत्रणा! राजकीय वर्तुळातून मोठी खळबळ

आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून टाईप यंत्रणा लावण्यास सुरुवात झालेली आहे. विट्यात संभाजी शेट पाटील यांना ठाकरे गटाने खुली ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात एकच प्रकारची खळबळ माजली आहे. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय बापू विभुते यांची संभाजी पाटील यांना खुली ऑफर दिली आहे.

संभाजी शेठ पाटील यांना मतदारसंघातील नवा चेहरा म्हणून मोठी ताकद देऊ असा विश्वास देत संजय बापू विभुते यांचे संभाजी शेर पाटील यांना ठाकरे गटात प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले आहे.

यामुळे आगामी आमदारकी निवडणुकीसाठी इच्छुक असणारे संभाजी शेठ पाटील उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणार का? तसेच आगामी आमदारकीसाठी ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून संभाजी शेठ पाटील रिंगणात उतरणार का? यासारखे असंख्य प्रश्न निर्माण झाल्याने संभाजी शेठ पाटील यांच्या भूमिकेकडे अखंड मतदार संघाचे लक्ष लागले आहे.