मोदी सरकारने ऑक्टोबर महिन्यात आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ करत मोठं दिवाळी गिफ्ट दिलं होतं, त्यानंतर त्यांचा महागाई भत्ता ५३ टक्के झाला आहे.आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. राष्ट्रपतींनी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यास मान्यता दिली आहे. मात्र, या बोनसचा लाभ काही केंद्रीय कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे.संरक्षण मंत्रालय २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी भारतीय लष्कर आणि आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्सच्या (AOC) पात्र संरक्षण नागरी कर्मचाऱ्यांना प्रोडक्टविटी लिंक्ड बोनस म्हणून ४० दिवसांचा अतिरिक्त पगार देणार आहे. याला राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे.
मंत्रालयाने यासंबंधीची अधिसूचनाही जारी केली आहे.भारतीय लष्कर आणि आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्सच्या (AOC) पात्र संरक्षण नागरी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर हा बोनस दिला जाईल. PLB स्कीम अंतर्गत येणाऱ्या भारतीय सैन्यातील एओसी आणि सर्व ग्रुप बी (नॉन-राजपत्रित) आणि सी कर्मचाऱ्यांना बोनस दिला जाईल.
बोनसची गणनेची मर्यादा ७००० रुपयांपर्यंत आहे. कर्मचाऱ्याच्या सरासरी पगाराला ३०.४ ने भागल्यानंतर मिळणारे मूल्याला ३० ने गुणले जाईल. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मासिक पगार २०,००० रुपये आहे. तर त्याला बोनस म्हणून अंदाजे १९,७३७ रुपये दिले जातील.