विधानसभा निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडवा यासाठी राज्य निवडणूक आयोगाने राज्यात चार दिवस ड्राय डे जाहीर केला आहे.त्यामुळे मद्यप्रेमींची चांगलीच पंचाईत होणार आहे. जाणून घ्या कोणकोणत्या दिवशी मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार आहेत.राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पर पडणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी 18 नोव्हेंबरच्या सायंकाळी 6 वाजल्यापासून राज्यातील मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार आहेत.
तसेच 19 आणि 20 नोव्हेंबरच या दोन्ही दिवशी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पर पडणार आहे. या दिवशी सुद्धा मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे. म्हणजेच हे चार दिवस राज्यात ड्राय डे असणार आहे आणि राज्यात कुठेही दारू मिळणार नाही. दारू विक्रीची दुकाने, बार, बिअर बार सर्व बंद असणार आहेत.
निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आणिय या निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अडथळा, व्यत्यय आणला जाऊ नये, दारूच्या नशेत कोणी गोंधळ घालू नये तसेच दारूच्या नशेत मतदाराने आपले अमूल्य मत गमावू नये यामुळे राज्यात मतदानाच्या 48 तास आधी म्हणजेच 2 दिवस आधी ड्राय डे घोषित करण्यात आला आहे.