खानापूर येथे महायुतीचे उमेदवार सुहासभैया बाबर यांची प्रचार सभा संपन्न झाली. माझ्याकडे काम घेऊन येताना अनिलभाऊ हक्काने येत होते. त्याच हक्काने शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राला मंजुरीचा विषय मांडला होता. उपकेंद्रासाठी खरा पाठपुरावा अनिल भाऊंनीच केलेला आहे. या निवडणुकीत राज्यात महायुतीचे सरकार येणार असून पहिल्याच बैठकीत सुहास भैया बाबर यांच्या मागण्या पूर्ण करू. सुहास बाबर यांना सर्व पक्षांचा पाठिंबा असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे. सुहास बाबर यांना आमदार करणे हीच स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांना श्रद्धांजली ठरेल. असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांनी मतदारसंघात विकासकामे कशी करायची याचा आदर्श घालून दिला.छोट्या गावातही त्यांनी कोट्यवधीं रुपयांचा निधी उपलब्ध करून देणारे आमदार हे देशातील एकमेव आमदार असतील. टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचा पाठपुरावा करणार े आणि स्वतः अनिलभाऊंनी आमच्यासारख्या मंत्र्यांना सुद्धा कामाची पद्धत दाखवून दिली होती.
तासगाव तालुक्यातील उपकेंद्र खानापूर येथे आणण्यासाठी फक्त अनिल भाऊं यांनीच प्रयत्न केले. सुहास बाबर यांनी खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र, मिनी एमआयडीसी, राज्यात गलाई व्यवसायाचा सूक्ष्म व लघुउद्योगमध्ये समाविष्ट करण्यासाठी तीन महिन्यांच्या आत पाठपुरावा करून मंजूर करू. सुभाष बाबर यांना मोठ्या मताधिक्याने विजय करा. त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आम्ही ताकद देऊ अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली.