आजअखेर सांगोला विधानसभा मतदारसंघात 500 पोस्टल मतदान 

सध्या राज्यभरात आगामी विधानसभा निवडणुकांच्या चर्चा सुरू आहेत. राज्यातील मतदार देखील आता आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज आहेत . 253 सांगोला विधानसभा मतदारसंघात वयोवृद्ध व दिव्यांग बांधवांसाठी घरी बसून मतदान कार्यक्रम सुरू झाला असून होम वोटिंग साठी एकूण मतदार 659  लाभार्थी आहेत त्यामध्ये 85 वर्षापेक्षा जास्त वयाचे 588 मतदार असून 71 मतदार  दिव्यांग बांधव आहेत या मोहिमेची सुरुवात १३ नोव्हेंबर पासून झाली आहे.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी भैराप्पा माळी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सुधीर गवळी, नोडल अधिकारी दिपाली जाधव मॅडम उपस्थित होत्या . घरी जाऊन मतदारसंघात मतदान घेण्यासाठी 13 टीम नेमण्यात आलेल्या आहेत.

त्यामध्ये केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मायक्रोऑबझरवर पोलीस कॉन्स्टेबल,व्हिडिओग्राफर व ड्रायव्हर  इत्यादी प्रमाणे एक अश्या 13 टीम नेमण्यात आल्या आहेत  त्यासाठी एकूण ₹13 रूट तयार करून तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण  होणार आहे. त्याचबरोबर पोस्टल मतदान सुरू असून बुधवारी 150 पोस्टल मतदान झाले होते   होम वोटींग   बुधवारचे 204 वयोवृद्ध व 11  दिव्यांग बांधवाचे मतदान पूर्ण झाले झाले आहे. असून एकूण 215 होम वोटिंग झाले आहे व आजअखेर पोस्टल मतदान 500  झाल्याचे मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले आहे.