आमदार अनिल बाबर हे पुजारवाडी दिघंची तालुका आटपाडी येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेले होते आणि त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांशी संवाद साधताना ते म्हणाले, टेंभू वर माझा दावा नाही पण सहाव्या टप्प्याचे काम मी स्वतः केले आहे.
आमदारकी गेली तरी चालेल पण हाती घेतलेले टेंभूचे काम पूर्ण करायचे असे मी ठरवले होते सरकार बदलले आणि कामाला गती मिळाली. सहाव्या टप्प्याची निविदा पंधरा दिवसात निघेल आणि मग कामालाही लगेच सुरुवात होईल. तुम्ही मला आमदार केले आहे याची जाणीव मला आहे. येणाऱ्या काळात खानापूर आटपाडी मतदारसंघाचे चित्र नक्कीच पालटणार आहे. असे ते म्हणाले.