सांगोल्यातील तिरंगी लढतीत जातीय समीकरणे पुन्हा ठरणार प्रभावी!

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघ सध्या राज्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. 1952 पासून येथे झालेल्या 16 निवडणुकांत धनगर समाजाचे 13 तर मराठा समाजाचे 3 आमदार निवडून आले आहेत.यामुळे सांगोला मतदारसंघात जातीय समीकरणं नेहमीच निर्णायक ठरली आहेत.

या वर्षीच्या तिरंगी लढतीत जातीय समीकरणे पुन्हा प्रभावी ठरणार आहेत. शहाजीबापू पाटील आणि दीपक साळुंखे पाटील यांच्यातील लढतीत मराठा समाजाची मते कुणाच्या बाजूला झुकतील हे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच गणपतराव देशमुख यांची पारंपरिक ‘व्होट बँक’ डॉ. बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा देईल का, याची उत्सुकता आहे.

1952 पासून सांगोल्यातील निवडणुका या जातीय समीकरणांवरच अवलंबून राहिल्या आहेत. यंदा शिवसेनेच्या दोन गटांतील उमेदवार आणि शेकापच्या उमेदवारात होत असलेली लढत सांगोल्यातील निवडणुकीला एक नवा रंग देत आहे. त्यामुळे यंदा कोण बाजी मारणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.