बुधवार दि ५ रोजी व दि. ६ रोजी सांगोला शहर आणि तालुक्यातील सकल मराठा समाजाची शहरातील माऊली मंदिर येथे नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेधार्थ ९ मार्च रोजी सांगोला बंद करण्याचा निर्णयही समाजाच्या वतीने घेण्यात आला. या नियोजन बैठकीस सांगोला शहर आणि तालुक्यातील असंख्य मराठा समाजासह बहुजन बांधव उपस्थित होते.
मस्साजोग येथील सरपंच स्व. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. स्व.संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना भर चौकात फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सांगोला तालुक्यातील सकल मराठा समाजाने लेखी निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांच्याकडे केली आहे. तसेच या हत्येच्या निषेधार्थ रविवार ९ मार्च रोजी सकल मराठा समजाने सांगोला बंदची हाक दिली आहे.