महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला तालुक्यातील अकोला (वासूद) गावात प्रचार सभा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते किसनबापू शिंदे होते. याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा.पी.सी.झपके, विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन तानाजी शिंदे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथभाऊ अभंगराव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे, पंचायत समितीच्या माजी सभापती शोभाताई खटकाळे, युवक नेते योगेशदादा खटकाळे, अनिलनाना खटकाळे, सूर्याजी खटकाळे, सुनील शिंदे, गावच्या सरपंच धनश्री गव्हाणे, शिवसेना शहर प्रमुख तुषार इंगळे, माजी सरपंच नारायण भोरे, नवनाथ खटकाळे, शिवाजीराव जावीर, नितीन रणदिवे, मार्केट कमिटीचे संचालक किशोर शिंदे, अमोल सावंत, रंगनाथ खटकाळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आतापर्यंतच्या आमदारांनी पाण्यासाठी कधीही शासनाला जाब विचारला नाही.
मतदारसंघाला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार व हा जनसेवेचा वारसा असाच समर्थपणे चालू ठेवणार आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघ विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे माझे उद्दिष्ट असून, मायबाप जनतेची मला याकरिता मतदारांची निश्चित साथ लाभेल. त्यासाठी मला तुमची साथ द्या. मतदारसंघातील जनतेला आता परिवर्तन हवे असल्याने आता ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल धगधणार असून खऱ्या अर्थाने लोकशाहीचा जागर होणार असल्याचा आशीर्वाद महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.
मतदारांशी संवाद साधताना दिपकआबा साळुंखे पाटील पुढे म्हणाले की, मतदार संघामध्ये आता विकासाची गरज आहे त्यामुळे परिवर्तन घडले पाहिजे, असा निश्चय जनतेने केला आहे. जनतेच्या या पाठिंबा व आशीर्वादामुळे आपला विजय निश्चित आहे. मतदारसंघातील सर्वांगीण विकास आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, अशी लोकांची मागणी आहे.
या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी, एक सक्षम पर्याय म्हणून मी त्यांच्या सेवेसाठी उभा आहे. माझ्या कार्यातून, मतदारसंघातील सर्व घटकांचा विकास सुनिश्चित करण्याची माझी कटिबद्धता आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघाला सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे नेण्यासाठी तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असावे असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.