विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांची हातकणंगले मतदारसंघात प्रचारात आघाडी…..

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खूपच कमी वेळ शिल्लक राहिल्या कारणाने मतदारसंघांमध्ये नेते मंडळींची लगबग सुरू झालेली आहे. प्रचार दौरे, सभा, गाठीभेटी यावर जोर दिला जात आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत असून प्रचारात महाविकास आघाडीचे उमेदवार राजूबाबा आवळे यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.  विद्यमान आमदार राजूबाबा आवळे त्यांनी तीन महिने आधीपासून आपल्या प्रचाराचे नियोजन केले तसेच त्यांना सतेज पाटील यांच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने त्यांच्या प्रचारात सुसुत्रता आहे. त्याचप्रमाणे सर्व समाजांसाठी केलेली विकासकामे, सर्वसमाजांमध्ये असलेला संपर्क त्यांच्यासाठी फायद्याचा ठरत आहे. सतेज पाटील यांची यंत्रणा व आवळे गट जोमात काम करत असून त्यांना निष्ठावंत शिवसैनिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे चांगले पाठबळ मिळत आहे.

राजूबाबा आवळे यांनी विरोधकांच्या टीकेला फारसा प्रतिउत्तर न देता विकासकामांच्या मुद्दयांवर प्रचार सुरूच ठेवला आहे. मतदारसंघात केलेली विकासकामे, आक्रमक प्रचार यंत्रणा आणि शेवटच्या चार दिवसांचे परफेक्ट नियोजन यामुळे आमदार राजूबाबा आवळे यांनी निर्णायक आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. एकंदरीत गेल्या १० दिवसांचा प्रचार पाहिला असता आमदार राजूबाबा आवळे यांनी निर्णायक आघाडी घेतली असून ते किती मताधिक्य घेतात याची चर्चा मतदारसंघात सुरु आहे.