20 नोव्हेंबर म्हणजे बुधवारच्या दिवशी मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी खूपच कमी वेळ शिल्लक राहिल्या कारणाने प्रत्येक मतदारसंघांमध्ये नेते मंडळींची लगबग सुरू असलेली पाहायला मिळत आहे. सुहास भैय्या बाबर यांच्या प्रचारार्थ डॉ. शितल बाबर, प्रा. सोनिया बाबर यांच्या नेतृत्वाखाली विटा येथे पदयात्रा काढण्यात आली. कार्यकर्ते घर टू घर प्रचार करीत आहेत. या पदयात्रेला उस्फूर्त प्रतिसाद देखील मिळत असलेला पाहायला मिळत आहे.
टेंभू योजनेसाठी स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांचे नाव सहाव्या टप्प्याला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे. यामुळे टेंभू योजनेबाबत स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्या योगदानावर शासनाने शिक्कामोर्तब केलेल आहे. विरोधक याबाबत काय म्हणतात याला आता काहीच अर्थ नाही. ही विकास कामे घेऊन कार्यकर्ते घर टू घर प्रचार करीत असताना पाहायला मिळत आहेत.
भाऊंच्या कामांची आम्हाला पदोपदी जाणीव होत असून विटा शहरात जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आम्हाला विटा शहरात मोठे मताधिक्य मिळण्याची खात्री संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा डॉ. शितल बाबर यांनी व्यक्त केली.