दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोल्यात उद्या धडाडणार शिवसेनेच्या खा.संजय राऊतांची तोफ …!

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आता एकच दिवस शिल्लक उरला आहे. 20 नोव्हेंबरला राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागेल. विधानसभेसाठी बुधवार, २० नोव्हेंबरला मतदान होत असून मतदानापूर्वी ४८ घंटे अगोदर म्हणजे सोमवार, १८ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६ वाजल्यानंतर निवडणुकीचा प्रचार करता येणार नाही अथवा सभा घेता येणार नाही.

18 तारखेला प्रचाराचा अवधी संपत असून त्याच पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यभरात महायुती आणि मविआच्या नेत्यांनी प्रचाराचा, सभांचा धडाका लावला आहे. राज्यात ठिकठिकाणी जाऊन मतदारांशी संवाद साधण्याचे सर्वांचेच प्रयत्न आहेत. सांगोल्यात महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिपकआबा साळुंखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवार १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता महूद ता.सांगोला येथील ग्रामपंचायतीच्या शेजारी नवीन बाजार पटांगणावर शिवसेनेचा बुलंद आवाज फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रचार सभेत खासदार संजय राऊत हे गद्दार आमदारासह बंडखोरावर कोणता निशाणा साधणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या सभेसाठी सांगोला विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा.पी.सी.झपके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. धनंजय पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे, शिवसेनेचे तालुका प्रमुख अरविंद पाटील यांनी केले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासाठी प्रचार सभा घेणार आहे. सोमवार १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता महूद ता.सांगोला येथील ग्रामपंचायतीच्या शेजारी नवीन बाजार पटांगणावर शिवसेनेचा बुलंद आवाज खासदार संजय राऊत यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुख्यमंत्री शिंदे पक्षाच्या उमेदवारांच्या उमेदवारांना लक्ष्य केले आहे.

त्यामुळे विधानसभा प्रचारात शिवसेना नेते अधिक आक्रमक झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारासाठी सांगोल्यात येणार आहेत. या प्रचार सभेत संजय राऊत हे शहाजीबापूंसह बंडखोरावर कोणता निशाणा साधणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.