खानापूर मतदारसंघात प्रचाराचा समारोप….

विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदान होत असून गेले तीन आठवडे धडाडत असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. भव्य रॅली, पदयात्रा, जाहीर सभांच्या धडाक्यात प्रचाराचा समारोप झाला. आता मतदानापर्यंत छुपा प्रचार चालणार असल्याचे चित्र दिसत आहे. खानापूर मतदारसंघात चुरशीने तिरंगी लढत होत आहे. महायुतीचे उमेदवार सुहास बाबर (शिवसेना) यांनी विटा येथे रॅली काढून प्रचाराचा समारोप केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) यांची लेंगरे येथे प्रचार समारोप सभा झाली. अपक्ष उमेदवार माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी सोमवारी आटपाडी तालुक्यात मतदारांच्या भेटीगाठी घेऊन प्रचाराचा समारोप केला.