आटपाडीत विशाल पाटलांचा संपर्क दौरा….

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळींचे गावोगावी दौरे सुरु आहेत. आटपाडी सांगली लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांनी आटपाडी तालुक्यातील पश्चिम भागात संपर्क दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष जयदीप भोसले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील, बाजार समितीचे उपसभापती राहुल गायकवाड, नगरसेवक मनोजदादा सरगर, डी. एम.पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

संपर्क दौ-यादरम्यान विशाल पाटील यांचे शिवसेना तसेच भाजपच्या सरपंच व पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी स्वागत व सत्कार केला. मानेवाडी, नेलकरंजी, कानकात्रेवाडी, तनपुरवाडी, घुलेवाडी, आवटेवाडी धावडवाडी या गावांत संवाद साधल्यानंतर त्यांचे खरसुंडी येथे श्री सिद्धनाथ मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समाजातील विविध घटकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. यावेळी शेती सिंचन उद्योग, दळणवळण याबाबत अनेक समस्या नागरिकांनी त्यांना सांगितल्या.


या सर्व समस्या ऐकल्यानंतर त्यांनी सध्याचे सरकार फक्त घोषणा व जाहिरातीवर अवलंबून असून स्थानिक पातळीवर अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने आगामी निवडणुकीत बदल करण्याचे आवाहन केले. यावेळी पाटील यांचा ठिकठिकाणी स्वागत व सत्कार करण्यात आला.