खानापूर विधानसभा मतदारसंघ २०२४ ची निवडणूक ऐतिहासिक ठरली. ते कारण असे की, महायुतीचे सुहास बाबर यांंना मिळालेल्या मताधिक्याने मतदारसंघात नवा विक्रम प्रस्थापित केला.सुहास बाबर यांना तब्बल ७८ हजार १७७ मते मिळाली. अनिलभाऊ बाबर यांचे निधन झाल्यापासून बाबर कुटुंबांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती. पहिल्यांदा शोभाकाकींच निधन झालं त्यानंतर अनिल भाऊच निधन यामुळे बाबर कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता.
गेल्या काही महिन्यांपासून आमदार अनिल भाऊंचे निधन झाल्यानंतर त्यांची खुर्ची ही रिकामी होती. त्यांच्या खुर्चीवर कधीही घरातील कुठली व्यक्ती बसली नाही. सुहास बाबर यांनी देखील त्या खुर्चीचा कधीही मोह केला नाही. ज्यावेळेस ते लोकांच्या बरोबर संपर्क साधायचे त्यावेळी देखील ते भाऊंच्या असणाऱ्या खुर्च ीजवळ खुर्ची घेऊन बसायचे. परंतु त्या खुर्चीवर ते कधीही बसले नाहीत.
विधानसभेची निवडणूक संपन्न झाली आणि ते आमदार झाले. लोकांनी त्यांना भरभरून प्रेम दिल तरी देखील सुहास भैया बाबर हे त्या खुर्चीवर बसत नव्हते. परंतु घरातील जेष्ठ मंडळी व कुटुंबाच्या आग्रहाखातर सुहास भैया बाबर यांनी आपल्या आमदार पदाचा पदभार स्वीकारला. सर्वांच्या आग्रहाखातर अनिल भाऊ हे बसत असणाऱ्या खुर्चीवरती ते बसले. हा क्षण कुटुंबियांसाठी व मतदार संघासाठी मोठा भावनिक होता. ते खुर्चीवर बसण्या अगोदर त्यांचे चुलते यांच्या गळ्यात पडले व त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. हा क्षण मात्र अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा असाच होता.