करेक्ट कार्यक्रम म्हटलं की जयंत पाटील हे समीकरण राज्यातील सर्व जिल्ह्यात पोहोचले आहे. ३५ वर्षाच्या धक्कादायक राज्याच्या राजकीय पटलावर त्यांनी आपल्या रली. नावाचा करिष्मा कायम ठेवला आहे. सत्ता जयंतरावांच्या असो वा नसो राज्याच्या राजकारणात ‘करेक्ट कार्यक्रम’ हा बोलबाला नेहमी असतो. लोकसभा निवडणुकीत त्यांनी ‘जयंत चाणक्यनीती’ ने दहा पैकी आठ जागांवर घवघवीत यश मिळवीत राष्ट्रवादीला मोठ्या उंचीवर नेले. लोकसभा निवडणूक त्यांच्यासाठी प्रभावी ठरली मात्र विधानसभा निवडणुकीचे निकाला त्यांना घातक ठरले. पूर्वीचा वाळवा आणि सध्याच्या इस्लामपूर मतदारसंघाचे ते आठव्यांदा प्रतिनिधित्व करीत आहेत. मात्र ही निवडणूक ‘आठ’ आणि ‘गाठ’ अशीच काहीशी ठरली आहे.
सांगली जिल्ह्यात दबदबा असणाऱ्या जयंतरावांना केवळ १३०७० इतके मताधिक्य मिळाले, जे सांगली जिल्ह्यातील आठ मतदारसंघातील सर्वात निच्चांकी आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सरसेनापती ठरलेले जयंत पाटील यांची विधानसभा निवडणुकीत पीछेहाट झाली. आता पुढील पाच वर्षे ‘जयंतनीती’ने ते राष्ट्रवादीला कसे सावरतात? हे पाहावे लागेल. सहा ही टर्ममध्ये जयंत पाटील आपले मताधिक्य पन्नास हजाराहून अधिक राखण्यात यशस्वी ठरले.
दरम्यान निशिकांत पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आणि विरोधाची धार तीव्र केली. २०२४ च्या निवडणुकीत मात्र जयंतनीती फोल ठरली. जयंत पाटील यांच्या तालमीत तयार झालेल्या निशिकांत पाटील यांनी मताधिक्य राखणारे जयंतरावांचे आडाखे मोडीत काढीत विरोधाची धार तीव्र केली अन जयंतरावांची नोंद सर्वात कमी मताधिक्याची झाली. इस्लामपूरच्या लढतीकडे राज्याचे लक्ष होते. येथे जयंत पाटील विरुद्ध अजित पवार असाच सामना गृहीत होता. सांगली जिल्ह्यातील आठ मतदारसंघात दरसाला लढती झाल्या.
खानापूर आटपाडीत सुहास बाबर यांना ७८, १८१ चे मताधिक्य मिळाले. पलूस कडेगाव मतदार संघात विश्वजीत कदम यांना ३००६४ चे, मिरज मतदार संघात सुरेश खाडे यांना ४५ हजार १९५चे मताधिक्य मिळाले. शिराळा मतदारसंघात सत्यजित देशमुख यांना २२ हजार ७८९, तासगाव कवठेमहांकाळ मध्ये रोहीत पाटील यांना २७ हजार ६४४ चे, सांगली मतदारसंघात सुधीर गाडगीळ यांना ३६ हजार १३५ चे, जत मतदारसंघात गोपीचंद पडळकर यांना ३७९१० चे मताधिक्य मिळाले. मात्र इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील यांना १३०२७ मताधिक्य मिळाले ज्याची सांगली जिल्ह्यात सर्वात कमी अशी नोंद राहिली आहे.